
आणीबाणीत बंदीवान झालेल्यांचा लोटिस्मा प्रकाशित करणार संदर्भ कोश.
१९७५ रोजी तत्कालीन पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लादल्यानंतर सर्वत्र देशभर धरपकड सुरू झाली. मिसा कायद्याखाली अनेकांना बेमुदत काळ तुरूंगात डांबण्यात आले. सत्याग्रह करणार्या अनेक देशभक्तांना कारागृहात टाकण्यात आले. या घटनेला येत्या २५ जून रोजी ५० वर्षे पूर्ण होत असताना या काळातील बंदिवानांची माहिती नव्या पिढीला ज्ञात असावी या उद्देशाने येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर बंदीवान संदर्भ कोश प्रकाशित करणार आहे. यासाठी कोकण विभागातील मुंबई ते सिंधुदुर्गपर्यंतच्या सात जिल्ह्यातून माहिती संकलन सुरू झाले आहे.www.konkantoday.com