अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे चिपळुणात १३ पासून किर्तन महोत्सव.
अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षानिमित्ताने१३ व १४ रोजी सायं. ६ वा. शहरातील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रासमोरील पटांगणावर कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.महासंघाचे रत्नागिरी, सिंधुदुर्ग विभागीय अध्यक्ष अप्पा खैर, जिल्हाध्यक्ष संदीप सावंत यांनी या महोत्सवाबाबत माहिती देताना सांगितले की, अखिल भारतीय मराठा महासंघ राष्ट्रीय पातळीवरील सर्वात मोठी अविभाजित संघटना ठरली आहे.
यावर्षी १२५ वर्षे पूर्ण होत असल्याने महासंघ शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष देशभरात साजरा करणार आहे. तसेच संघटनेचे संस्थापक अध्यक्ष कै. ऍड. शशिकांत पवार यांच्या स्मृतीदिनाचे औचित्य साधून देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. त्याचा शुभारंभ येथे कीर्तन महोत्सवाच्या माध्यमातून करण्यात येत आहे.www.konkantoday.com