
हापूस आंब्याच्या पेट्या पुणे-मुंबईच्या बाजारात दाखल; पेटीला मिळाला 21 हजार रुपये दर
रत्नागिरी तालुक्यातील रिळ येथील बागायतदार मकरंद काणे यांच्या बागेतील हापूस आंब्याच्या दहा पेट्या पुणे आणि मुंबई बाजारात पाठवण्यात आल्या आहेत.एक पेटीला २१ हजार रुपये दर मिळाला आहे. दोन दिवसांपूर्वी रत्नागिरी तालुक्यातील तरुण बागायतदार मकरंद काणे यांच्या बागेतील हापूस आंबा काढणी ३० जानेवारीला करण्यात आली.
५ व ६ डझनच्या पेट्या भरून त्यांची पूजा करण्यात आली. त्यानंतर चार पेट्या पुणे येथील अडतदार अरविंद मोरे यांच्याकडे पाठविण्यात आल्या. तेथील बाजार समितीच्या फळे व तरकारी विभागाचे प्रमुख बाळासाहेब कोंडे व अडतदार युवराज काची यांच्या हस्ते आंब्याच्या पेटीचे पूजन झाले. पाच डझनांच्याया पेटीला लिलावात सुमारे २१ हजार रुपये दर मिळाला. अडतदार युवराज काची यांनी या आंब्यांच्या पेटीची खरेदी केली. उर्वरित सहा पेट्या मुंबईतील बाजारात पाठविण्यात आल्या आहेत.