रत्नागिरीतील शिरगांव येथील मत्स्य विद्यार्थ्यांना फायबर नौका बांधणी प्रशिक्षण
रत्नागिरी शिरगांव येथील मत्स्य अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाचे तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांचे फिशिंग बोट कन्स्ट्रक्शन ऍण्ड मरीन इंजिन या विषयांतर्गत फायबर ग्लास मासेमारी नौका बांधणी प्रशिक्षण कासारवेली, रत्नागिरी येथे आयोजित करण्यात आले होते.
या प्रशिक्षणांतर्गत सहभागी विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे फायबर मासेमारी, नौकांचे फायबर साचे तयार करणे, साच्यापासून नौका तयार करून त्यावर डेक, केबिन तयार करणे, डेकवरती विविध प्रकारची मासेमारी साधने बसविणे आणि इंजिन व त्यांची उपकरणे बसवून नौका कार्यात्वित करणे याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला