भारतीय कोस्टगार्डचा जगात चौथा क्रमांक.
सागरी हिताचे रक्षण करण्यासाठी आणि देशाच्या सागरी कायद्याजी अंमलबजावणी करण्यासाठी, भारतीय तटरक्षक भारतीन नौदलाकडून हस्तांतरित केलेल्या २ लहान कार्वेटस आणि पाच गस्ती नौका या तुटबुंज्या साधनांसह, भारतीय तटरक्षक दलाने वयम रक्षामः म्हणजेच आम्ही संरक्षण करतो या ब्रीदवाक्याने आपले कार्य सुरू केले. आज त्याच्या ४९ वर्षानंतर भारतीय तटरक्षक दलाने स्वतःला जगातील चौथ्या क्रमांकाचे कोस्टगार्ड म्हणून प्रस्थापित केले आहे. ज्यात आता १५१ जहाजे आणि ७६ विमाने आहेत, ती भारतीय किनारपट्टीच्या ७,५०० कि.मी. अंतरावर तैनात आहेत.दरवर्षी भारतीत तटरक्षक दल तटरक्षक दिनानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करते.
४९ व्या स्थापना दिनानिमित्ताने भारतीय तटरक्षक अवस्थान रत्नागिरीने १ फेब्रुवारी रोजी रत्नागिरी आणि भारतीय तटरक्षक वायू अवस्थान रत्नागिरीच्या कमांडिंग ऑफिसरसह जिल्ह्यातील सरकारी, कॉर्पोरेट आणि इतर मान्यवर यांच्या उपस्थितीत युनिट परिसरात स्थापना दिनानिमित्त एक समारंभ आयोजित केला होता. या कार्यक्रमादरम्यान, भारतीय तटरक्षक दलाच्या वर्षभरातील कार्याचे आणि जबाबदार्यांची मागणी उपस्थितांना देण्यात आली.
सागरी हिताचे रक्षण करण्यासाठी आणि देशाच्या सागरी कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी भारतीय तटरक्षक दल १ फेब्रुवारी १९७७ रोजी भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत संघाचे सशस्त्र दल म्हणून अस्तित्वात आले. भारतीय तटरक्षक अवस्थान रत्नागिरीच्या कमांडिंग ऑफिसरने तटरक्षक दलाला आपल्या जबाबदारी पार पाडताना निरंतर सहकार्य केल्याबद्दल निमंत्रितांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.www.konkantoday.com