चिपळूण तालुक्यातील गाणे गुरववाडी येथे तरूणाची आत्महत्या
चिपळूण तालुक्यातील गाणे गुरववाडी येथील ऋषिकेष गणेश गजमल (२६) याने शनिवारी दुपारी १ वाजता शेतातील वाड्याच्या भालाला गळफास घेवून आत्महत्या केली. तो सकाळी गावातील एकाला पाण्याच्या टाकीजवळ भेटला होता. यावेळी त्याने मी आकले येथे मंडप सोडायला जाणार आहे,
मात्र दुपारी २ वाजता तू शेतातील वाड्यात ये, असे सांगितले. त्यानुसार तो गेला असता तेथे त्याला ऋषिकेश हा गळफास घेतलेल्या स्थितीत दिसला. त्यामुळे त्याने दिलेल्या खबरीनुसार अलोरे-शिरगाव पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.www.konkantoday.com