
घाटमाथ्याला जोडणाऱ्या तिलारी घाटाच्या दुरुस्तीला अखेर बांधकाम विभागाला मुहूर्त मिळाला
कोकण आणि घाटमाथ्याला जोडणाऱ्या तिलारी घाटाच्या दुरुस्तीला अखेर बांधकाम विभागाला मुहूर्त मिळाला आहे.घाटातील एका वळणावर अपघातप्रवण क्षेत्र असून, तिथली दुरुस्ती गरजेची असल्याच्या मुद्यावर एसटी महामंडळाचा वाहतूक विभाग ठाम राहिल्याने बांधकाम विभागाने आजपासून कामाला सुरुवात केली आहे.
अपघातप्रवण जागेवर गॅबियन भिंत उभारण्यात येणार असून, त्यासाठी सुमारे पंधरा दिवसांचा कालावधी लागणार आहे. तेवढा काळ घाटातील वाहतूक बंद राहणार आहे. कोल्हापूर जिल्ह्याचा दक्षिण भाग, बेळगाव परिसरातील वाहनधारकांना कोकण व गोव्याला जाण्यासाठी हा सर्वांत जवळचा मार्ग ठरतो. त्याशिवाय कर्नाटक, केरळ राज्यांतील अवजड वाहतूक याच मार्गाने मोठ्या प्रमाणात होते.