
गोव्यात बोट उलटल्याने पर्यटकांचा मृत्यू प्रकरणी व्यावसायिकावर 3 वर्षाची बंदी
ख्रिसमसच्या दिवशी कळंगुटच्या किनाऱ्यावर बोट कलंडल्याने महाराष्ट्रातील खेड येथील सूर्यकांत पोफळकर (५४) या पर्यटकाचा मृत्यू झाला होता, तसेच या दुर्दैवी घटनेत पाच जाणं गंभीर जखमी झाले होते.यावर कारवाई करत गोवा पर्यटन खात्याने बोट मालकाच्या व्यवसायावर तीन वर्षांसाठी बंदी आणली आहे. बोटमध्ये अधिक वजन झाल्याने ती वजन पेलवू शकली नाही आणि परिणामी एका पर्यटकाचा बुडून मृत्यू झाला होता.
मीना कुतिन्हो असे बोट मालकाचे नाव असून पर्यटन विभागाच्या आदेशानुसार पुढील तीन महिन्यांसाठी बोट मालकाला हा व्यवसाय सुरु करता येणार नाही. गोवा पर्यटन विभागाचे संचालक केदार नाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार ख्रिसमसच्या दिवशी ती बोट बऱ्यापैकी ओव्हरलोड झाली होती तसेच बोट मालकाकडे व्यवसाय चालवण्यासाठी वैध परवाना नसल्याचेही उघड झाले होते.