कोकण रेल्वेचे मध्य रेल्वेमध्ये विलीनीकरण करण्याबाबत आमच्यापर्यंत कोणताही प्रस्ताव नाही-कोकण रेल्वेचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा


कोकण रेल्वेचे मध्य रेल्वेमध्ये विलीनीकरण करण्याबाबत लोकप्रतिनिधी आणि प्रसार माध्यमांमध्ये ऐकतोय, वाचतोय; परंतु आमच्यापर्यत असा कोणताही प्रस्ताव आलेला नाही. त्यामुळे त्यावर अधिक बोलणे योग्य ठरणार नाही, अशी प्रतिक्रिया कोकण रेल्वेचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा यांनी दिली.रत्नागिरी-दिवा पॅसेंजरला दादरपर्यंत नेण्यात कोणतीही अडचण नाही. मध्य रेल्वेसोबत याबाबत चर्चा सुरू आहे. लवकरच अंतिम निर्णय घेतला जाईल. नागपूर-मडगांव ही स्पेशल ट्रेन नियमित करण्याचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठवला असून, लवकरच त्यावर सकारात्मक निर्णय होईल, असे झा यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button