आयुष्यमान कार्ड निर्मितीअधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी बुधवारी शिबीर
*रत्नागिरी, : “क्षेत्रीय कार्यालयासाठी 100 दिवसांचा कृती आराखडा” अनुषंगाने बुधवार दि. 5 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता अल्पबचत सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय आवार येथे आयुष्यमान कार्ड निर्मिती कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. तरी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आयुष्यमान कार्ड निर्मितीसाठी लागणारे कागदपत्रे ऑनलाइन बारा आकडी रेशनकार्ड नंबर, आधार कार्ड व त्याच्याशी संलग्न मोबाईल नंबर यांच्यासह स्वत: उपस्थित रहावे, असे निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी कळविले आहे.
“क्षेत्रीय कार्यालयासाठी 100 दिवसांचा कृती आराखडा” या विषयावर दि.7 जानेवारी रोजी मुख्यमंत्री महोदयांनी राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षक यांच्याशी दूरदृष्य प्रणालीद्वारे संवाद साधून सामान्य नागरिकांचे दैनंदिन जीवन सुकर व्हावे (Ease of Living) याकरीता 7कलमी कृती कार्यक्रम निश्चित करून दिला आहे. या सात कलमी कार्यक्रमांतर्गत राज्यातील प्रशासनास येत्या 100 दिवसात प्राधान्याने करावयाच्या कार्यवाहीबाबत सविस्तर सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्याअनुषंगाने उद्या सकाळी 10 वाजता अल्पबचत सभागृह,येथे “आयुष्मान कार्ड निर्मिती” कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे.