मांडवी येथे 22 मे रोजी बीचवरील कुस्ती स्पर्धा,राज्यात पहिल्यांदाच या स्पर्धेचे रत्नागिरी येथे आयोजन

रत्नागिरी:- राज्यात पहिल्यांदाच बीचवरील कुस्ती स्पर्धेचे आयोजन रत्नागिरी येथील मांडवी बीचवर करण्यात येणार आहे. दिनांक 22 मे सायंकाळी 5 वाजता महिला व पुरूष विभागात एकूण 10 गटात ही आगळीवेगळी कुस्ती भरवण्यात येणार असल्याची माहिती रत्नागिरी जिल्हा कुस्ती असोसिएशनचे कार्यवाह सदानंद जोशी यांनी पत्रकारांना दिली.

माती, गादीवरील कुस्ती स्पर्धेबरोबर आता बीच कुस्ती स्पर्धा हा नवीन कुस्ती प्रकार समाविष्ठ झाला आहे. त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्रात प्रथमच जय भैरव नवरात्रोत्सव मंडळ मांडवी, मांडवी पर्यटन संस्था मांडवी व रत्नागिरी जिल्हा कुस्ती असोसिएशन रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने जोंधळ्या मारूती मंदिर मांडवी येथे बीचवरील कुस्ती स्पर्धा भरवण्यात येणार आहे. महिला व पुरूष विभागात एकूण 10 गटात ही स्पर्धा भरवली जाणार आहे. जिल्ह्यातील युवा कुस्तीपटूंना जास्तीत जास्त संधी मिळावी, कुस्तीची परंपरा जिल्ह्यात रूजावी यासाठी या स्पर्धेचे 22 मे रोजी आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती श्री.जोशी यांनी दिली.

ते पुढे म्हणाले की, प्रत्येक गटातील विजेता व उपविजेता यांना रोख बक्षीस व चषक देवून सन्मानीत करण्यात येणार आहे. स्पर्धकांना प्रवास भत्ता, जेवणाची सोय आदीं व्यवस्था आयोजकांकडून करण्यात येणार आहे. या नाविन्यपूर्ण स्पर्धेला रत्नागिरी जिल्ह्यातील स्पर्धक व प्रेक्षक भरभरून प्रतिसाद देतील अशी आयोजकांना अपेक्षा आहे. या स्पर्धेच्या अनुषंगाने 21 मार्च रोजी सकाळी 7 ते 8 या दरम्यान मांडवी बीचवर स्वच्छता अभियान राबवण्यात येणार आहे. यावेळी जिल्हा कुस्ती असोसिएशनचे अध्यक्ष श्रीकृष्ण उर्फ भाई विलणकर, मांडवी पर्यटन संस्था मांडवीचे अध्यक्ष राजीव कीर, कुस्ती असोसिएशनचे सदस्य आनंद तापेकर उपस्थित होते.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button