राजापूर डोंगर भागात वणव्यात 300 हून अधिक काजूची झाडे खाक
राजापूर शहरानजीकच्या शीळ येथील डोंगर परिसर (सडा) वणवा लागून गेले दोन दिवस वणव्यामध्ये होरपळत होता. निकराच्या प्रयत्नामुळे वणवा विझविण्यात ग्रामस्थांना यश आले असले तरी वणव्यामध्ये गुरांच्या वैरणीच्या गवतासह डोंगर भागामध्ये शेतकर्यांनी विकसित केलेल्या आंबा, काजूच्या बागांना वणव्याची झळ पोहोचून त्यामध्ये लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे.या वणव्यामध्ये ऐन हंगामामध्ये काजू बागायतदारांचे नुकसान होताना काजू बिया लगडलेली 300 हून अधिक काजूची झाडे जळून खाक झाली आहेत. त्याचवेळी, वणव्यामध्ये गवत जळून खाक झाल्याने गुरांच्या वैरणीचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.