
मुंबई-गोवा महामार्गावर पावसापूर्वी मोठ्या प्रमाणात काम पूर्ण होणार, खासदार नारायण राणे यांना ठेकेदारांचे आश्वासन
मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामावरही खासदार नारायण राणे यांनी प्रतिक्रिया दिली. महामार्गाच्या दुरवस्थेमुळे कोकणवासीयांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. मात्र, येत्या पावसाळ्याच्या आत महामार्गाच्या मोठ्या भागाचे काम पूर्ण होईल, असे ठेकेदाराने आश्वासन दिल्याची माहिती राणे यांनी दिली.
त्यांनी नमूद केले की, “मुंबई-गोवा महामार्ग कोकणातील जनतेसाठी महत्त्वाचा असून, सरकारही या प्रकल्पाला प्राधान्य देत आहे. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी महामार्गाच्या बहुतांश कामाचा ताण हलका होईल.”