
देवगड तालुका आंबा उत्पादक संस्थेने ‘देवगड हापूस’ फळाला ‘युनिक कोड’ देणे हे क्रांतिकारी पाऊल उचलले
सर्वसामान्य ग्राहकाला ओरीजनल ‘देवगड हापूस’ व अन्य भागात उत्पादित आंबा यांच्यातील फरक सहजपणे समजत नाही, यामुळे ग्राहकाची फसवणूक होते. त्याचबरोबर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ‘देवगड हापूस’ची बदनामी होते. ही भेसळ व फसवणूक टाळण्यासाठी देवगड तालुका आंबा उत्पादक संस्थेने ‘देवगड हापूस’ फळाला ‘युनिक कोड’ देणे हे क्रांतिकारी पाऊल उचलले आहे.
देवगड हापूस आंब्याच्या नावाने होणार्या बोगस विक्रीला पायबंद घालण्यासाठी हापूसच्या ‘जीआय’ची देवगड तालुक्यासाठीची रजिस्टर्ड प्रोप्रायटर अर्थात र्लीीीेंवळरप असलेल्या देवगडतालुका आंबा उत्पादक सहकारी संस्थेने 2 जानेवारी 2025 रोजी हा निर्णय जाहीर केला. यानुसार यावर्षी बाजरपेठेत येणार्या ‘देवगड हापूस’च्या प्रत्येक फळावर संस्थेचा ‘युनिक कोड’ असणार आहे. आंबा फळावर या कोडचा स्टीकर पाहूनच ग्राहकांनी ‘देवगड हापूस’ खरेदी करावयाचा आहे. कोकणातील हापूस आंब्याला यापूर्वीच ‘जीआय’ मानांकन मिळाले आहे. आता त्यापुढेही जात देवगड तालुका आंबा उत्पादक संस्थेने ‘देवगड हापूस’साठी युनिक कोडची संकल्पना अंमलात आणली आहे. या कोडसाठी टीपी सील (ढझ डशरश्र)चे पेटंट मिळालेल्या मुंबई येथील सन सोल्यूशन या कंपनीबरोबर संस्थेने आधीच करार केला आहे,