
रिफायनरीवर मुख्यमंत्र्यांची पेट्रोलियम मंत्र्यांशी चर्चा
प्रस्तावित बारसू रिफायनरीचे ३ भाग करण्यात येतील, अशी घोषणा केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी केलेल्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुरी यांची भेट घेतली. तसे फोटो व माहिती पुरी आणि फडणवीस यांनी ट्विटरवर दिली आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी यांना धन्यवाद दिले आहेत आणि नमूद केले आहे की, कोकण रिफायनरी प्रकल्प त्याचबरोबर नागपूर प्रकल्पावर तपशीलवार चर्चा झाली. यासाठी पुरी यांच्याकडून जोरदार स्वागत झाले. केंद्रीयमंत्री हरदीपसिंग पुरी यांनी आपल्या ट्विटर खात्यावर म्हणजे एक्स खात्यावर या भेटीचे फोटो दिले असून उर्जा सुरक्षिततेसंदर्भात महाराष्ट्राचा सहभाग याविषयी चर्चा चांगल्या वातावरणात पार पडल्याचे त्यांनी म्हटले आहे.
www.konkantoday.com