शाळेच्या इमारतीचा भाग चाळीवर कोसळला, चार जण जखमी, एकाची प्रकृती चिंताजनक
मुंबईतील सांताक्रुज (पश्चिम) येथील जुहू तारा रोडवरील माणिकजी कूपर हायस्कूलच्या शालेय इमारतीचे पाडकाम शुक्रवारी सुरू होते. इमारतीच्या पिलरचा एक मोठा भाग अचानक शेजारील चाळीवर कोसळला. ज्यामुळे तेथे असलेले चार तरुण जखमी झाल्याची घटना घडली आहे.या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जखमी झालेल्या व्यक्तींमध्ये कमलेश कुमार यादव (वय २८) आणि मनीष कुमार साहनी (वय २४) यांचा समावेश आहे. त्यांना त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, मनीष कुमार याची प्रकृती चिंताजनक असल्याचे रुग्णालयातील सूत्रांनी सांगितले. या दुर्घटनेत काही गंभीर जखमा झाल्या असल्या तरी, सुदैवाने जीवितहानी झाली नाही, अशी माहिती पालिकेच्या आपत्कालीन विभागाने दिली.