
4 हजार 300 कर्मचारी मागणीवर ठाम , त्यामुळे 2 हजार 100 अंगणवाड्यांना अद्यापही कुलूप
अंगणवाडी सुरू न करणार्या, कामावर हजर न होणार्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना प्रशासनाने कारवाईच्या नोटिसा बजावल्या आहेत. या नोटीसनंतर 705 कर्मचारी कामावर परतले आहेत. मात्र 4 हजार 300 कर्मचारी मागणीवर ठाम आहेत. त्यामुळे 2 हजार 100 अंगणवाड्यांना अद्यापही कुलूप आहे.
महिन्याभरापासून जिल्ह्यात अंगणवाडी कर्मचार्यांनी बेमुदत संप सुरू केला आहे. या संपात बहुसंख्य कर्मचारी सहभागी झाले होते. परिणामी अंगणवाड्यांना कुलूप होते. त्यामुळे गेल्या महिन्याभरापासून बालकांचा पोषण आहार थांबला होता. सेविका, मदतनीसांवर कारवाई करा, अंगणवाडीच्या चाव्या ताब्यात घ्या, असे आदेश
शासनाने प्रशासनाला दिले आहेत. आदेशानुसार जिल्हा परिषदेच्या प्रशासनाकडून जिल्ह्यातील अनेक कर्मचार्यांना कारवाईच्या नोटीस दिल्या आहेत. त्यामुळे कारवाईच्या धास्तीने काही अंगणवाडी सेविका, मदतनीस अंगणवाडीत दाखल झाल्या आहेत. मात्र अद्यापही कर्मचारी मागणीवर ठाम आहेत.
www.konkantoday.com