
रोख तरलता वाढवून बाजारात तेजी आणण्याची ताकद असलेल्या मध्यमवर्गाला दणदणीत सवलत देणारा अत्यंत सकारात्मक अर्थसंकल्प – ॲड. दीपक पटवर्धन.
अलीकडे भारताचा विकासदर, भारताचे दरडोई उत्पन्न याबद्दल प्रचंड चर्चा होत होती. उद्योग क्षेत्रात गुंतवणूक मंदावली आहे असं दिसत होतं. बँकांमध्ये कॅश क्रंच सुरू आहे. हे सर्व आर्थिक आजार प्राथमिक अवस्थेत दुरुस्त करण्यासाठी मोदी शासनाने हुकूमाचा एक्का वापरत १२ लाख उत्पन्नापर्यंत आयकर शून्य केला. यामुळे मध्यमवर्गाची पर्चेसिंग पॉवर वाढणार आहे. बाजारात खर्च करण्याची क्षमता वाढवल्याने त्याचा खूप लाभ विकास गती वाढण्यादृष्टीने होईल.
शेती, लघु मध्यम उद्योग, आरोग्य शिक्षण, पायाभूत सुविधा, रोजगार या प्रत्येकक्षेत्रा चा विचार करूँ सर्वांगीण प्रगती साधत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याच्या उद्दिष्टाला समर्पित असलेला हा अर्थसंकल्प आहे.एकूण मोदी ३ मधील पहिले बजेट सर्वत्र सुखाची लहर पसरवेल.बजेटचे मी मनःपूर्वक स्वागत करतो व मोदी शासनाचे अभिनंदन करतो अशी प्रतिक्रिया माजी जिल्हाध्यक्ष भा.ज.पा व स्वामी स्वरूपानंद पतसंस्था अध्यक्ष ॲड.दीपक पटवर्धन यांनी व्यक्त केली.