
रत्नागिरीच्या जुवे येथील सचिन चव्हाण या तरूणाने साकारली मार्मागोवा युद्धनौका प्रतिकृती.
युद्धनौका नेमकी कशी असते, तिच्यावर नेमकं काय काय असतं, याची अनेकांना उत्सुकता असते. मात्र इच्छा असूनही सर्वसामान्यांना ती पाहता येत नाही. पण रत्नागिरी शहरानजिकच्या जुवे येथील सचिन चव्हाण या तरूणाने आपल्या टीमसह भारतीय नौदलाच्या ताफ्यात दोन वर्षापूर्वी दाखल झालेल्या अत्यंत आधुनिक अशा मार्मागोवा युद्धनौकेची २० फूट लांबीची प्रतिकृती रत्नागिरीत तयार केली आहे. या प्रतिकृतीचे ३ फेब्रुवारी रोजी गोवा येथील वॉर मेमोरियल कॉलेज येथे व्हाईस ऍडमिरल यांच्या हस्ते अनावरण होणार आहे.शहरानजिकच्या कर्ला जुवे येथील रहिवासी असलेले सचिन चव्हाण हे नेव्हल एनसीसी डिपार्टमेंट मुंबई येथे नोकरीला आहेत.

नौदलाकडूनच आयएनएस मार्मागोवा या युद्धनौकेची सचिन चव्हाण यांना ही प्रतिकृती बनवण्यात सांगण्यात आली होती. चव्हाण व टीमने रत्नागिरीतच जुवे येथे २० फूट लांब आणि साडेसात फूट उंचीची ही प्रतिकृती तयार केली. त्यासाठी त्यांनी सुमारे महिनाभर ती प्रतिकृती तयार करण्यासाठी मेहनत घेतली. चव्हाण यांनी रत्नागिरी तालुक्यातील कापडगांव येथील किरण शिंदे, झरेवाडी येथील क्षितिज कळंबटे, नांदेड येथील संघर्ष नरवाडे, कणकवलीतील हर्ष पांगे, सातारा येथील हेमंत भाग्यवंत या कारागिर तरूणांचेही सहकार्य घेतले.www.konkantoday.com