
स्वारगेट बस स्थानकात ड्रामा! तृप्ती देसाई गृहराज्यमंत्र्यी योगेश कदम यांच्या गाडीवर धावून गेल्या.
स्वारगेट बस स्थानकामध्ये उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये एका तरुणीवर अत्याचाराची घटना घडली. बस स्थानकात ही घटना घडल्यानंतर सर्वत्र एकच खळबळ उडाली. या घटनेनंतर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.घटनेचे तीव्र पडसाद देखील उमटत आहेत. स्वारगेट बस स्थानकाला कालपासून मिनी छावणीचे स्वरूप आले आहे. यातच आता काही वेळापूर्वीच हाय होल्टेड ड्रामा रंगला. यात सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
गृहराज्यमंत्री योगेश कदम स्वारगेट आगारात पाहणी करण्यासाठी आले असता भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी योगेश कदम यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आणि त्या गाडीवर धावून गेल्या. यामुळे एकच गोंधळ उडाला. पोलिसांनी तृप्ती देसाई यांना ताब्यात घेतले आहे.
गृहराज्यमंत्री योगेश कदम आणि पुणे पोलीस आयुक्त पत्रकारांशी चर्चा न करता स्वारगेट आगारातून निघून गेले. ते आयुक्तालयात पत्रकारांशी संवाद साधणार असल्याचे सांगण्यात येत आहे.48 तास होऊन गेले तरीही स्वारगेट बस स्थानकात महिलेवर अतिप्रसंग करणारा आरोपी अटक होत नाही, याचा जाब विचारण्यासाठी तृप्ती देसाई गृहराज्यमंत्र्यांच्या गाडीकडे धावल्या. पोलिसांनी त्यांना वेळीच रोखले आणि ताब्यात घेतले.




