
चिपळूणचे सुपुत्र तथा ज्येष्ठ गायक राजाभाऊ शेंबेकर यांचा ५ मार्चला रत्नागिरीत गौरव.
चिपळूणचे सुपुत्र तथा ज्येष्ठ गायक राजाभाऊ शेंबेकर यांचा हा सत्कार सोहळा ५ मार्च रोजी तालयोगी पं. सुरेश तळवलकर यांच्या हस्ते आणि प. मुकुंद मराठे व मान्यवरांच्या उपस्थितीत रत्नागिरी शहरात आयोजित करण्यात आला आहे.चिपळूण शहरातील माळनाका येथील मराठा मंडळ हॉल येथे सायंकाळी ६ ते ९ या वेळेत हा कार्यक्रम होणार आहे. शेंबेकर यांनी आपल्या सुरेल गायनाने व अमूल्य योगदानाने संगीतविश्वात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
चरितार्थासाठी आयुष्यभर चालक म्हणून कठीण आणि दमछाक करणारी नोकरी करताना प्रत्यक्ष गुरू नसूनही ज्यांच्या गाण्याचा ध्यास सुटला नाही, असा एकलव्य साधनेने आपले गाणे समृद्ध करणारा हा शापित गंधर्व आपली गायकी स्वतःपुरती मर्यादित न ठेवता मुक्तहस्ताने आपल्या शिष्यांना शिकवणारे आणि रसिकांना मंत्रमुग्ध करणारे राजाभाऊ अतिशय निःस्पृह आणि निरपेक्षपणे संगीत सेवा करत असतात.www.konkantoday.com




