
रत्नागिरी व्यापारी संघटनेच्या वतीने नामदार उदय सामंत यांचे आभार
रत्नागिरीत लॉक डाऊनला शिथीलता मिळावी व दुकाने उघडण्यास परवानगी मिळावी या व्यापाऱयांच्या मागणीबाबत नामदार उदय सामंत यांनी लक्ष्य घालून मागणी पुरी केल्याबद्दल शहर व्यापारी संघटनेच्या वतीने त्यांचे आभार मानण्यात आले आहेत याबाबत रत्नागिरी शहर व्यापारी महासंघाचे अध्यक्ष उदय पेठे यांनी रत्नागिरीतील व्यापार उद्योग सुरू करण्याबाबत आमदार सामंत यांनी पुढाकार घेतल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले आहेत आता रत्नागिरीतही नियमित बाजारपेठ सुरू करण्याबाबत सूचना देण्यात येणार आहेत तसेच शहर व्यापारी संघटनेच्यावतीने दुकानाची वेळ सात वाजेपर्यंत करण्यात यावी अशी मागणी प्रशासनाकडे करण्यात आली आहे
दरम्याने याबाबत निर्णय घेण्याचे अधिकार प्रांतांना असून त्याने सुधारित आदेश तातडीने काढावे अशी मागणी रत्नागिरीतील व्यापाऱयांनी केली आहे.
www.konkantoday.com