लाडक्या बहिणी तुपाशी, ठेकेदार उपाशी, लाडकी बहीण कार्यक्रमाची ३५ लाखांची बिले प्रलंबित.
गतवर्षी ऑगस्ट महिन्यात चंपक येथील मैदानावर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना शुभारंभाचा मोठा जिल्हास्तरीय कार्यक्रम झाला होता. या कार्यक्रमासाठी चहा, नाष्टा, पाणी पुरवणारे पुरवठादार अद्याप ३५ लाखांच्या बिलापासून प्रशासनाकडून वंचित आहेत. ६ महिने उलटूनही बिले अदा न झाल्याने पुरवठादार आर्थिक अडचणीत आले आहेत.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून रत्नागिरी जिल्ह्यातील सुमारे ४ लाख १७ हजार लाडक्या बहिणींना महिन्याला ६१ कोटी रुपये वाटप होत आहेत. या योजनेच्या प्रसार आणि प्रचारासाठी रत्नागिरी चंपक मैदानावर २१ ऑगस्ट रोजी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत भव्य कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी सुमारे ५० ते ५२ हजार महिला उपस्थित होत्या.www.konkantoday.com