रत्नागिरी गणेशोत्सव मंडळातर्फे आरोग्य मंदिर येथे माघी गणेशोत्सव साजरा करण्यात येणार.

रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे यांच्या प्रेरणेतून आणि कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरीमध्ये रत्नागिरी गणेशोत्सव मंडळातर्फे आरोग्य मंदिर येथे माघी गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे.शनिवार, १ फेब्रुवारी ते शुक्रवार, ७ फेब्रुवारी या कालावधीत हा उत्सव साजरा होणार असून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये शनिवारी सकाळी ७ वाजता श्रींची प्राणप्रतिष्ठापना करण्यात येईल. सायंकाळी ८ ते १० या कालावधीत फुणगुस येथील बुवा गौरव पांचाळ आणि साई प्रासादिक भजन मंडळाचे भजन कार्यक्रम होईल.

२ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता श्री सत्यनारायणाची महापूजा होणार असून सायंकाळी ४ ते रात्री ९ वाजेपर्यंत तीर्थप्रसाद आणि महिलांचे हळदीकुंकवाचे आयोजन करण्यात आले आहे.

३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५.३० ते ७.३० या कालावधीत नृत्यार्पण नृत्य अकादमीच्या संचालिका गुरु सौ. प्रणाली तोडणकर-धुळप यांच्या शिष्यांचे भरतनाट्यम आयोजित करण्यात आले आहे, तर रात्री ८ ते ९ या वेळेत श्री स्वामी समर्थ प्रासादिक भजन मंडळ केळये यांचे भजन होणार असून बुवा उदय मेस्त्री असणार आहेत.

४ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजता शालेय विद्यार्थ्यांचे अथर्वशीर्ष पठण होईल, तर रात्री ८ ते १० या कालावधीत भक्तीगीत व भावगीतांचा कार्यक्रम स्वर आराधना आयोजित करण्यात आला आहे.५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४ ते ६ या वेळेत लांजा येथील श्री. कुर्णेकर महाराज यांचा हरिपाठ होणार असून रात्री ८ ते १० या वेळेत श्री साई सेवा महिला भजन मंडळ वांयगणकरवाडी आंबेशेत यांचे भजन होणार आहे.

६ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ ते ३ या वेळेत महाप्रसाद, तर सायंकाळी ७ वाजता शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या उपस्थितीत महाआरती होणार आहे. ७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४ ते १० यावेळेत श्रींची आरोग्य मंदिर येथून भव्य विसर्जन मिरवणूक निघणार आहे.या सर्व कार्यक्रमांना उपस्थित राहून श्रींचे दर्शनासाठी अवश्य यावे, असे आवाहन रत्नागिरी गणेशोत्सव मंडळ यांच्यातर्फे करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button