
परप्रांतीय कंत्राटी कामगारांना ठेकेदाराने बंद कारखान्यात डांबल्याचा प्रकार मनसेने केला उघड.
लोटे औद्योगिक वसाहतीतील एका कारखान्यात काम करणार्या शेकडो परप्रांतीय कंत्राटी कामगारांना ठेकेदाराने बंद कारखान्यात अक्षरशः डांबून ठेवण्याचा प्रकार उघडकीस आला. मनसेचे तालुकाप्रमुख निलेश बामणे यांच्या तत्परतेने सर्व कामगारांची सुटका करण्यात आली. त्या ठेकेदाराकडून कामगारांना मारहाणीसह निकृष्ट दर्जाचे जेवण देत हालअपेष्टा केल्या जात होत्या, असा आरोपही पिडीत कामगारांनी केला आहे.एका कंपनीत शेकडो परप्रांतीय कामगार एका ठेकेदाराकडे कंत्राटी पद्धतीने काम करत ोते.
या कामगारांना निकृष्ट दर्जाचे व तुटपुंजे जेवण दिले जात होते. ठेकेदाराकडे असलेल्या व्यवस्थापकासह अन्य दोन व्यक्तींमार्फत काठी रबरी पाईपच्या सहाय्याने सातत्याने मारहाणही केली जात होती, असा आरोपही कामगारांनी केला आहे.www.konkantoday.com