
देशातील आठ समुद्र किनाऱ्यांना ‘ब्लू फ्लॅग’नं गौरविण्यात आलं,महाराष्ट्रातील एकाही समुद्र किनाऱ्याचा समावेश नाही
देशातील आठ समुद्र किनाऱ्यांना ‘ब्लू फ्लॅग’नं गौरविण्यात आलं आहे. ब्लू फ्लॅग प्रमाणपत्र देऊन या किनाऱ्यांचा सन्मान करण्यात आला असून, दुर्दैवानं यात महाराष्ट्रातील एकाही समुद्र किनाऱ्याचा समावेश नाही. याबद्दल युवक काँग्रेसचे महाराष्ट्राचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी खंत व्यक्त केली आहे. त्याचबरोबर पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे अपेक्षाही व्यक्त केली आहे.
देशभरातील आठ समुद्र किनाऱ्यांना प्रतिष्ठित समजला जाणारा ‘ब्लू फ्लॅग’ देण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली. भारतातील द्वारका, शिवराजपूर, घोघला, कासरकोड, कप्पड, रुशिकोंडा, अंदमान आणि निकोबार या समुद्र किनाऱ्यांना हा पुरस्कार मिळाला आहे.
www.konkantoday.com