नामदार उदय सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेच्यावतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन

रत्नागिरी* : *राज्याचे उद्योग आणि मराठी भाषा मंत्री ना. उदय सामंत* यांच्या वाढदिवसानिमित्त रत्नागिरी विधानसभा मतदार संघामध्ये शिवसेना पक्षाच्यावतीने विविध सामाजिक उपक्रम असलेल्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये रक्तदान शिबीर, शालेय विद्यार्थ्यांना साहित्य वाटप, सामाजिक संस्थांना दैनंदिन गरजेच्या वस्तूंची भेट, शासकीय रूग्णालयासाठी आवश्यक असलेले साहित्य वाटप आदि कार्यक्रमांचे नियोजन आहे.गेल्या 27 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीमध्ये नामदार उदय सामंत यांनी काम करत असताना नेहमीच सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रिडा या सर्व क्षेत्रामध्ये काम केले आहे. त्यांच्या सोबत असलेले त्यांचे सहकारी यांनी देखील हाच वसा सुरू ठेवला आहे.

ना. उदय सामंत यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रविवार 22 डिसेंबर पासून 26 डिसेंबर या कालावधीत *रत्नागिरी तालुका व रत्नागिरी शहर शिवसेनेच्यावतीने* लोकाभिमुख कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. *शिवसेना तालुकाप्रमुख महेश उर्फ बाबू म्हाप व शिवसेना शहरप्रमुख बिपिन बंदरकर* यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे.*गोळप जिल्हा परिषद गटामध्ये* 24 डिसेंबर रोजी रक्तदान शिबीर, *पाली जिल्हा परिषद गटामध्ये* 24 ते 26 डिसेंबर या कालावधीत तालुकास्तरीय भव्य कबड्डी स्पर्धा तसेच 26 डिसेंबर रोजी रात्रौ 10 वा. ना. उदय सामंत यांचा अभिष्टचिंतन सोहळा, *नाचणे जिल्हा परिषद गटातर्फे* 25 डिसेंबर रोजी रिमांड होम येथे फळवाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. *जिल्हा परिषद गट वाटद* च्यावतीने 26 डिसेंबर रोजी भव्य रक्तदान शिबीर व फळवाटप कार्यक्रम, *पावस जिल्हा परिषद* गटाच्यावतीने 26 डिसेंबर रोजी महिला वृद्धाश्रमास आवश्यक साहित्याचे वाटप केले जाणार आहे.

*मिरजोळे जिल्हा परिषद गटात* धान्य वाटप कार्यक्रम व कालिका मंदिर मिरजोळे येथे अभिषेक सोहळा संपन्न होणार आहे. *हरचिरी जिल्हा परिषद* गटाच्यावतीने चांदेराई प्राथमिक आरोग्य केंद्र येथे रूग्णांना फळवाटप कार्यक्रम तसेच *शिरगांव जिल्हा परिषद* गटामध्ये 26 डिसेंबर रोजी सर्व शाळांना वह्या व खाऊ वाटप तसेच 85 वर्षावरील ज्येष्ठांना फळवाटप कार्यक्रम आयोजित केला आहे. त्याचप्रमाणे *करबुडे जिल्हा परिषद* गटामध्ये 26 डिसेंबर रोजी सर्व शाळांमध्ये खाऊवाटप कार्यक्रम होणार आहे. *कोतवडे जिल्हा परिषद* गटाच्या वतीने 26 डिसेंबर रोजी श्री क्षेत्र गणपतीपुळे मंदिरात अभिषेक सोहळा व अन्नदानाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे.

पूर्ण रत्नागिरी विधानसभा मतदार संघात नामदार उदय सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक समाजउपयोगी कार्यक्रम होत असून कार्यकर्ते त्यासाठी सज्ज झाले आहेत.त्याचप्रमाणे *रत्नागिरी शहर शिवसेनेतर्फे* 22 ते 26 डिसेंबर या कालावधीत मोफत नेत्र तपासणी, शिबीर प्रभाग क्र. 5 तर्फे *शिवसेना विभाग प्रमुख दिपक पवार* यांनी आयोजित केलेले आहे. *शहर संघटक सौरभ मलुष्टे* यांच्यावतीने शिरगांव येथील वृद्धाश्रमास साहित्य वाटप कार्यक्रम, त्याचप्रमाणे प्रभाग क्र. 2 चे *माजी नगरसेवक निमेश नायर* यांनी 25 डिसेंबर रोजी सावरकर नाट्यगृहासमोरील जागेत लहान/मोठ्या मुलांसाठी *‘हॅप्पी स्ट्रीट’* हा वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम आयोजित केलेला आहे.26 डिसेंबर रोजी शिवसेना रत्नागिरी शहर यांच्या वतीने *शहरप्रमुख बिपिन बंदरकर* यांच्या मार्गदर्शनाखाली पुढीलप्रमाणे कार्यक्रमाचे आयोजन आहे.

प्रभाग क्र. 11च्या वतीने *विभागप्रमुख बाळू गांगण व उपशहरप्रमुख किरण सावंत* यांच्यावतीने नगर परिषद शाळा क्र. 8 येथील अंगणवाडीमध्ये लहान मुलांना खाऊवाटप, श्री देव भैरी मंदिर चरणी अभिषेक व प्रार्थना तसेच जिल्हा शासकीय रूग्णालयातील रूग्णांना फळवाटप कार्यक्रम, तसेच *शहरप्रमुख बिपिन बंदरकर* यांच्यावतीने चंपक मैदान येथील गोशाळेला चारा व औषध वाटप कार्यक्रम, आशादिप संस्था, रत्नागिरी येथे मुलांना लागणा-या दैनंदिन साहीत्याचे वाटप व माहेर संस्था, रत्नागिरी या संस्थेला साहित्य भेट कार्यक्रम आयोजित केला आहे. *रत्नागिरी ग्रामीण व शहर युवासेने* च्या वतीने 25 डिसेंबर रोजी मोफत रक्तदान शिबीराचे आयोजन जिल्हा शासकीय रूग्णालय येथे सकाळी 9 ते 3 या वेळेत करण्यात आले आहे.

शिवसेना तालुका महिला आघाडीतर्फे* 25 डिसेंबर रोजी माहेर संस्था, रत्नागिरी येथील मुली व महिलांसाठी उपयुक्त साहित्य व गरजेच्या वस्तूंचे व खाऊचे वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.*चांदोर येथे जिल्हा परिषद विभाग संघटक शंकर गोरे*, यांनी दरवर्षीप्रमाणे 25 डिसेंबर रोजी रात्रौ 10 वा. अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button