
वेंगुर्ले तालुक्यातील एका युवकाकडून रशियन युवतीचा विनयभंग
सिंधुदुर्ग जिल्ह्यात एका युवकाने रेडी येथे एका (रशियन) युवतीचा विनयभंग करण्याची घटना घडली आहे. सचिन शशिकांत रेडकर (वय सुमारे ४० रेडी ) असे आरोपीचे नाव आहे. याबाबत संबधित युवतीने दिलेल्या फिर्यादीनुसार संबधित युवकाविरोधात वेंगुर्ले पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला नोटीस देण्यात आली आहे.हा गुन्हा दि. २८ जानेवारी रोजी दुपारी १२.४० वा. च्या सुमारास वेंगुर्ले तालुक्यातील रेडी हुडा येथे घडला आहे.
वालेरिया दिमित्री बिलीव्हा (वय 23) रा. रशियन कॉलेज, व्यवसाय मार्केटिंग व टुरिझम, सध्या रा. गोवा (भारत) असे त्या रशियन युवतीचे नाव आहे. ती आपल्या मित्रांसोबत शिरोडा वेळागर येथे फिरण्यासाठी आली असता फिरून झाल्यानंतर पुन्हा आपल्या गोवा येथील हॉटेलमध्ये जात असताना रेडी हुडा येथे आले असता त्यांच्या मित्रांची गाडी स्लीप झाल्याने त्यांना सावरण्यासाठी वालेरिया बिलीव्हा या थांबल्या असता संबधित युवकाने तेथे येऊन त्यांच्या अंगाला स्पर्श करून त्यांच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले आहे, अशी फिर्याद दिली आहे.