
माजी आमदार राजन साळवी भाजपाच्या वाटेवर असल्याची पुन्हा जोरदार चर्चा सुरू.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचा कट्टर, कडवट शिवसैनिक म्हणून ओळख असलेले राजापूरचे माजी आमदार राजन साळवी यांनी उद्धव ठाकरे गटाला अखेरचा जय महाराष्ट्र करण्याचा निर्णय पक्का झाला असल्याचे कळत आहे तारीख निश्चित नसली तरी लवकरच ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा परत एकदा सुरू झाली आहे यामुळे ठाकरे गटाला कोकणातून आणखी एक धक्का बसणार आहे.
ठाकरे गटाचे माजी आमदार राजन साळवी यांनी शिवसेना सोडून भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. मागील काही दिवसांपासून राजन साळवी यांच्या नाराजीच्या बातम्या समोर येत होत्या. त्यांच्या नाराजीचे मुख्य कारण म्हणजे पक्षातील अनेक अंतर्गत विवाद आणि त्यांना दिले जाणारे दुर्लक्ष या सर्व घटकांमुळे त्यांनी शिवसेना सोडून भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला असल्याचे कळत आहे