दाभोळ-वाशिष्ठी खाडीत ‘बंपर’ मासळीची लॉटरी.
चिपळूण जवळकरंबवणे वाशिष्ठी-दाभोळ खाडीत माशांचा बंपर लॉट येथील स्थानिक मच्छीमारांना लागला आहे. गेल्या 25 वर्षांत प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात मासे सापडल्याने खाडीपट्ट्यातील मच्छीमार आनंद व्यक्त करीत आहेत.बंद ठेवण्यात आलेले सक्शन पंप, कमी झालेले लोटेतील प्रदूषण आणि नव्या़ सरकारच्या काळात ठप्प झालेली एलईडी मासेमारी याचा परिणाम म्हणून दाभोळ, वाशिष्ठी खाडीपट्ट्यात मच्छीमारांना बंपर मासळी सापडली आहे.
खाडीतील दिवा बेट परिसरात मंगळवारी कोतवली येथील मासेमारांना तब्बल हजार किलो तर आयनीमधील मासेमारांना 1 हजार 700 किलो मासे मिळाले. यामुळे स्थानिक भोई मासेमार व्यावसायिकांची चंगळ झाली आहे. या बद्दल या मासेमारांकडून आनंद व्यक्त होत आहे.