तर वक्फ बोर्ड थेट मातोश्रीवर दावा सांगेल, तेव्हाच त्यांना कळेल- नितेश राणे यांची उद्धव ठाकरेंवर टीका.

मत्स्य आणि बंदर मंत्री नितेश राणे यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना थेट एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांच्या भावाची उपमा दिली आहे. भारतातील रोहिंगे मुसलमान आणि बांगलादेशींच्या उपस्थितीवर राणेंनी प्रश्न उपस्थित केला आहे.बेकायदेशीररित्या राहणाऱ्या नागरिकांना भारतात राहण्याची परवानगी देता कामा नये, असेही राणे म्हणाले. नितेश राणे म्हणाले की, भारतात बेकायदेशीररित्या राहात असलेले बांगलादेशी नागरिक आणि रोहिंगे हे सुरक्षेच्या दृष्टीने चिंतेचा विषय आहे. समाजाचे इस्लामीकरण करण्याचा हा एक प्रयत्न असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली. मंगल प्रभात लोढा आणि किरीट सोमय्या यांच्यासोबत अनेक भाजपा नेते मुंबईच्या भल्यासाठी काम करत असल्याचेही ते म्हणाले.बांगलादेशी आणि रोहिंग्यांनी भारतात बेकायदेशीररित्या राहणे हा सुरक्षेसाठी मोठाच धोका आहे.

हा आपल्या समाजाचे इस्लामीकरण करण्याचा प्रयत्न असल्याचा दावा त्यांनी केला. गेल्या काही काळात घडलेल्या अशा घटना मुंबई तसेच देशासाठी समोर आले आहे. बेकायदेशीर प्रवाशांना भारतात राहण्याची परवानगी देता कामा नये, तर त्यांना पाकिस्तान किंवा बांगलादेशात पाठवायला हवे, असेही ते म्हणाले.नितेश राणे यांनी ठाकरे गट आणि मुस्लिम लीगची तुलना केली आहे. ठाकरे आणि ओवैसी हे भाऊ – भाऊ आहेत, असेही ते म्हणाले. ठाकरेंची शिवसेना ही मुस्लिम लीग प्रमाणे आहे. लीग जे सांगेल अगदी तसेच ठाकरे गट करत असतो. पण त्यांना आज कळणार नाही, तर वक्फ बोर्ड थेट मातोश्रीवर दावा सांगेल, तेव्हाच त्यांना कळेल, असा टोलाही राणे यांनी ठाकरेंना लगावला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button