
एसटीच्या तिकीट दरवाढी विरोधात उद्धवसेनेचे कणकवली बस स्थानकात जोरदार घोषणाबाजी करत चक्काजाम आंदोलन
एसटीच्या तिकीट दरवाढी विरोधात उद्धवसेनेच्यावतीने आज कणकवली बस स्थानकात जोरदार घोषणाबाजी करत चक्काजाम आंदोलन करण्यात आले. यावेळी शासनाकडे प्रवाशांच्या व जनतेच्या भावना कळवा अन्यथा मोठे आंदोलन करू असा इशारा जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांच्यासह उपस्थित नेत्यांनी दिला.यावेळी एसटीचे वाहतूक अधिकारी निलेश लाड यांच्याशी चर्चा करण्यात आली.
एसटी प्रवाशांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. कणकवली बसस्थानकातील स्वच्छतागृह अस्वच्छ झाले असून त्याची तातडीने स्वच्छता करावी. यासह अन्य प्रमुख मागण्या देखील करण्यात आल्या. यावेळी या आंदोलनातील मागण्या वरिष्ठ कार्यालयाला पाठवण्याची ग्वाही लाड यांनी दिली. बसस्थानकामधून बाहेर जाणाऱ्या एसटी रोखून धरत काहीवेळ चक्काजाम आंदोलन करण्यात आले.




