
जिल्ह्यातील तलाठी दोन महिने वेतनाविना?
कोरोनासारखी आपत्ती असो किंवा नैसर्गिक आपत्ती असो, ग्रामीण भागात महत्वाची भूमिका बजावणार्या तलाठ्यांना गेल्या दोन महिन्याचा पगार मिळाला नसल्याचे कळत आहे. निधीअभावी हे पगार होत नसल्याचे कळत आहे. तसेच त्याआधी झालेल्या पगारातही केलेल्या कपातीचा तपशिल मिळालेला नाही. एकीकडे पगाराची ही अवस्था असताना गावातील दस्त व शासकीय येणी त्वरित जमा करण्याचे आदेश या तलाठ्यांना देण्यात आले आहेत.
www.konkantoday.com