कोकणामध्ये गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे कोकणातील रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. मुसळधार पावसामुळे राजापूर तालुक्यात सुद्धा अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली. राजापूर तहसीलदार श्रीमती प्रतिभा वराळे यांनी पूरस्थितीची पाहणी करण्याकरिता विविध ठिकाणी भेट दिली. ठाकरे वाडी पुलाच्या वरती अतिवृष्टी व भरती यामुळे पाणी जमा झाले होते या पाण्यामुळे ठाकरेवाडीचा संपर्क तुटला होता. ही परिस्थिती तहसीलदार प्रतिमा वराळे यांना माहिती पडल्यानंतर त्यांनी सदर ठिकाणी भेट दिली व बाधित ग्रामस्थांशी संवाद साधला व त्यांना मदतीचे आश्वासन दिले. या वेळी नाटे ग्रामस्थांनी पुल नसल्याने होत असलेल्या त्रासाचा पाढा तहसीलदार यांच्या समोर वाचला. यावेळी नाटे गावांमध्ये गाव पातळीवर राजकीय विचारसरणी बाजूला ठेवून स्थापित झालेली नाटे ग्रामविकास समन्वय समितीचे अध्यक्ष रमेश लांजेकर, पदाधिकारी, सदस्य व ग्रामस्थांच्या वतीने ठाकरेवाडी पुलाच्या संदर्भात एक निवेदन तहसीलदार राजापूर यांना देण्यात आले. राजकीय विचारसरणी बाजूला ठेवून गावाच्या विकासा करिता एकत्र येऊन गठित केलेल्या या नाटे ग्रामविकास समन्वय समितीचे कौतुक सर्व स्तरावरून केले जात आहे व या समितीच्या कार्यातून नाटे गावाच्या विकासाला वेग मिळण्याचा विश्वास ग्रामस्थांमध्ये निर्माण झाला आहे.
www.konkantoday.com
Back to top button