शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रत्नागिरी येथे एकाच दिवशी दोन देहदान
दिनांक – २७/०१/२०२५ रोजी सकाळी ९.०० वाजता सुरेश भावे यांचे देहदान शासकिय वैद्यकिय महाविद्यालय रत्नागिरी येथे करण्यात आले.त्यानंतर संध्याकाळी ०६.१५ मि. गणेश विनायक वैद्य. वय – ८६ वर्ष. राहणार – टिळक आळी,रत्नागिरी यांचे देहदान वैद्यकिय महविद्यालय रत्नागिरी येथे करण्यात आले.दिनांक – २७/०१/२०२५ रोजी रत्नागिरी येथे वृद्धापकाळाने गणेश वैद्य यांचे निधन झाले. त्यांच्या पत्नी रोहिणी वैद्य यांचे २०१६ रोजी मुंबई येथील के ई एम हॉस्पिटल येथे देहदान करण्यात आले होते.
गणेश वैद्य यांनी काही दिवसांपूर्वी वैद्यकिय महविद्यालय रत्नागिरी येथे मरणोत्तर देहदान साठी संकल्प केला होता त्यानुसार गणेश वैद्य यांची मुलगी सौ. मंजिरी प्रदिप आगाशे व जावई श्री. प्रदिप आगाशे यांनी गणेश वैद्य यांचे देहदान केले.यावेळी समाजसेवक विनायक शितुत यांचे सहकार्य लाभले. गणेश वैद्य यांचे देहदान दिनांक २८/०१/२०२५ रोजी शासकीय वैद्यकिय महाविद्यालय रत्नागिरी येथे करण्यात आले.
देहदानाच्या या संपूर्ण प्रक्रियेमध्ये शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालय रत्नागिरी चे अधिष्ठाता डॉ.जयप्रकाश रामानंद यांच्या मार्गदर्शनाखाली शरीररचनाशास्त्र विभाग प्रमुख डॉ. सादिकअली सय्यद, डॉ. योगिता कांबळे, डॉ.मंजुषा रावळ,शरीररचनाशास्त्र विभागातील कर्मचारी पूर्वा तोडणकर,भूमी पारकर,यश म्हस्के तसेच समाजसेवा अधिक्षक श्री.रेशम जाधव यांनी काम पाहिले.