रत्नागिरीउद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नवनियुक्त तालुकाप्रमुख शेखर घोसाळे यांनी जाहीर केल्याप्रमाणे साळवी स्टॉप येथील शिवसेना शाखेमध्ये शक्ती प्रदर्शन करत केला प्रवेश
रत्नागिरी : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नवनियुक्त तालुकाप्रमुख शेखर घोसाळे यांचे साळवी स्टॉप शहर शाखा क्र. १ येथे मोठ्या जल्लोषात केले स्वागत करण्यात आले. १ मे १९९५ साली ज्यांच्या जोरावर ही शाखा उभी राहिली त्या जुन्या शिवसैनिकांनी आवर्जून उपस्थित राहत शेखर घोसाळे यांना शुभेच्छा दिल्या. यामध्ये सुभाष वैद्य, बाळू जाधव, उदय बने, मिलिंद सुर्वे, बावाशेठ सावंत, विजय देसाई आदींचा सामावेश होता.
साळवी स्टॉप येतील शिवसेना शाखेत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे रत्नागिरी तालुकाप्रमुख शेखर घोसाळे यांचे मोठ्या उत्साहात कार्यकर्त्यांनी स्वागत केले. यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी, महिला मोठ्या संख्येने शाखेत उपस्थित होत्या.तालुकाप्रमुख शेखर घोसाळे यांनी शिवसेना शाखेमध्ये प्रवेश केल. त्यावेळी शिवसैनिकांनी मोठा जल्लोष करून घोषणाबाजी केली. तसेच पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतानाच फटाके फोडून, मिठाई वाटून आनंदोत्सव करण्यात आला.