मोदी सरकार करणार नवा धमाका! 4 दिवसांचा होणार आठवडा.
कामाचे तास किती असावेत यावर फक्त भारतात नाही तर अन्य देशात देखील चर्चा होत असते. नारायणमूर्ती यांच्या मते युवकांनी दररोज 12 तास काम केले पाहिजे. तर सुब्रह्मण्यन यांनी रविवारी सुट्टी न घेता काम केले पाहिजे असा सल्ला दिला. यावरून दोघांवर सोशल मीडियावर टीका होत होती. या सर्व पार्श्वभूमीवर भारतात आठवड्यातील 4 दिवस कामाच्या वेळापत्रकावर चर्चा सुरू झाली आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारमण आगामी अर्थसंकल्पात टप्प्याटप्प्याने कामगार संहिता लागू करण्याची योजना जाहीर करू शकतात.आगामी अर्थसंकल्पात मोदी सरकार नवीन कामगार संहिता नियम लागू करण्याची घोषणा करेल, असा विश्वास अनेकांना आहे. तसे झाल्यास देशात नवीन कामगार संहिता तीन टप्प्यांत लागू होईल.