
मुंबई-गोवा महामार्गावरील भोस्ते घाटात टँकर दरीत कोसळला, चालक बचावला. मायiu
मुंबई-गोवा महामार्गावरील भोस्ते घाटात रविवारी सायंकाळच्या सुमारास मालवाहू टँकर दरीत कोसळला. ब्रेक निकामी होवून मागे घेत असताना चालकाचा ताबा सुटल्याने अपघात घडला. अपघातात चालक सुदैवाने बचावला असून टँकरचे नुकसान झाले आहे. मुंबईहून चिपळूणच्या दिशेने टँकर जात असताना भोस्ते घाटात अचानक ब्रेक निकामा झाला.
टँकर रिव्हर्स घेत असताना थेट दरीत कोसळला. अपघाताची खबर मिळताच स्थानिक पोलीस तातडीने घटनास्थळी पोहचले. टँकरमधील रसायन इतरत्र पसरल्याच्या शक्यतेने यंत्रणांची धावाधाव सुरू झाली. मात्र टँकरमधील रसायन बाहेर पडले नसल्याची बाब निदर्शनास येताच सार्यांनीच सुटकेचा निःश्वास टाकला.www.konkantoday.com