
मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांचे मिरकर वाडा येथील कारवाई केल्या बद्दल अभिनंदन करणारे फलक शहरात झळकले.
देश आणि राज्याच्या सागरी सीमा सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य… म्हणून हवे हिंदुत्ववादी सरकार’ असे ठळक वाक्य असलेले मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांचा हिंदू योद्धा म्हणून उल्लेख करणारे आणि मिरकरवाडा येथील कारवाईबद्दल त्यांचे आभार मानणारे भले मोठे फलक रत्नागिरी शहरात सगळीकडे लावण्यात आलेला होते.यातूनच ना. राणे यांनी केलेल्या कारवाईचे स्वागत रत्नागिरीतील हिंदू समाजाने केल्याचा संदेश देण्यात आला होता.हि बॅनर शहरात विविध झळकली. शहराचे प्रवेशद्वार असलेल्या साळवी साळवी स्टॉप, मारुती मंदिर, पेठकिल्ला या भागात लावण्यात आले आहे