
चिपळूण कावीळतळी येथे थकीत बिल वसुलीसाठी गेलेल्या वीज कर्मचार्याना मारहाण
थकीत वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या दोन कर्मचाऱ्यांना एका ग्राहकाने मारहाण केल्याची घटना चिपळूण येथील काविळतळी येथे मंगळवारी रात्री घडली आहे. याप्रकरणी येथील पोलीस स्थानकात एका ग्राहकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबतची फिर्याद वीज कर्मचारी धनवंत विठ्ठल जाधव यांनी दिली आहे. यानुसार विजय आणि त्यांचे सहकारी उमेश पांडुरंग दरवडा हे दोघेजण काविळतळी परिसरात वीज बिल वसुलीसाठी गेले होते. यावेळी ग्राहक मोहसीन दाऊद मुकादम यांच्या सदनिकेत जाऊन थकीत वीज बिलासंदर्भात विचारणा केली. यावेळी वीज पुरवठा खंडित करण्यावरून मुकादम यांना राग आला. त्यांनी धनवंत जाधव यांना मारहाण केली.
www.konkantoday.com