जिल्हा परिषद शाळांमध्ये माहिती अधिकार फलक लावण्याची अंमलबजावणी केव्हा होणार?
रत्नागिरी. राज्य शासनाच्या नियमाप्रमाणे जन माहिती अधिकारी आणि अपिलीय अधिकारी फलक लावणे बंधनकारक असतानाही कराड आणि पाटण तालुक्यातील काही जिल्हा परिषद शाळामध्ये माहिती अधिकार फलक लावलेले नसून वरिष्ठांच्या आदेशाची पायमल्ली केली जात असल्याच्या तक्रारी होत आहेत.या शाळांमधून माहिती अधिकार फलक लावण्याची अंमलबजावणी केव्हा होणार? असा सवाल ही सर्वसामान्य नागरिक आणि पालकांमधून विचारला जात आहे. राज्य शासनाच्या नियमाप्रमाणे सर्व जिल्हा परिषद शाळांमध्ये जन माहिती अधिकारी आणि अपिलीय अधिकारी फलक लावणे बंधनकारक आहे.
राज्य शासनाच्या नियमाला अदिन राहून जिल्हास्तरावरून आणि तालुका स्तरावरून ही जन माहिती अधिकारी फलक लावण्याचा तोंडी आणि लेखी सूचना कराड आणि पाटण तालुक्यातील शाळांना देण्यात आले आहेत. या पत्राची काही जिल्हा परिषद शाळाच्या आडमुठ्या धोरणामुळे जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक फलक लावत नसल्याच्या घटना घडत आहेत. कराड पाटण तालुक्यातील काही शाळांमधून वरिष्ठांनी दिलेल्या लेखी आणि तोंडी सूचनाची ही पायमल्ली केली जात असल्याच्या चर्चा तालुक्यातून होत आहेत. जन माहिती अधिकारी आणि अपील अधिकारी लावण्याबाबत कराड आणि पाटणचे गटशिक्षणाधिकारी ज्या शाळांनी अद्याप माहिती अधिकार फलक लावलेले नाही. नव्याने सूचना देऊन हे फलक लावावेत अशी मागणी सर्वसामान्य पालक वर्ग आणि नागरिकांतून होताना दिसत आहे. या मागणीच्या अनुषंगाने शिक्षण विभाग योग्य ती कारवाई करणार का असा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित होत आहे.
राज्य शासनाच्या नियमानुसार जिल्हा आणि तालुका स्तरावरून देखील जिल्हा परिषद शाळांना सूचना देण्यात आलेले आहेत. गेले कित्येक दिवसा पूर्वी सूचना दिलेल्या असून सुद्धा अद्याप काही मुख्याध्यापकांनी आपल्या शाळेत दर्शनी भागावरती जन माहिती अधिकारी आणि अपिलीय अधिकारी फलक लावलेले दिसत नाहीत. वरिष्ठांच्या पत्राचा मान राखतानाही वेळ काढूपणा होताना दिसत आहे. यावरून जिल्हा परिषद शाळा प्रशासनाला वरिष्ठांचा धाक राहिला नाही का, की वरिष्ठांचा धाक नक्की कमी झालाय.