
जिल्हा न्यायालय समोरील रस्त्यावर कारला धडक देणार्या दुचाकीस्वारावर गुन्हा दाखल.
रत्नागिरी जिल्हा न्यायालय समोरील रस्त्यावर कारला धडक देणार्या दुचाकी स्वारावर शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. अपघाताची घटना शनिवारी सायंकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास घडली. प्रथमेश इंद्रसेन पाटील (३०, रा. भंडारपुळे, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.
प्रथमेश हा २५ जानेवारी रोजी आपल्या ताब्यातील दुचाकी (एमएच ४३ सीएफ ७४९०) चालवित जिल्हा न्यायालय समोरील रस्त्यावरून जात होता. सायंकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास समोरील आयटेन गाडीला त्यांच्या दुचाकीची धडक बसली. या प्रकरणी पोलिसांनी निष्काळजीपणे वाहन चालविल्याचा ठपका ठेवत प्रथमेश याच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला.www.konkantoday.com