
चिपळूण एन्रॉन पूल दुरूस्तीसाठी महिनाभर राहणार बंद
महापुरात खचलेल्या गोवळकोट पेठमाप येथील वाशिष्ठी नदीवरील एन्रॉन पूल दुरूस्तीसाठी सोमवारपासून महिनाभर वाहतुकीसठी बंद ठेवण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतला आहे. २०२१ च्या महापुरात एन्रॉन पूल मध्यवर्ती भागात खचला. या पुलाच्या दुरूस्तीसाठी सुमारे १.७० कोटींचा निधीही मंजूर करण्यात आला. त्यानंतर पुलाच्या दुरूस्तीत वारंवार अडचणी आल्या. त्यामुळे दुरूस्ती तब्बल साडेतीन वर्षानंतरही सुरूच आहे.
महापुरात एन्रॉन पूल मध्यवर्ती भागात खचला, त्यानंतर सुरक्षेचा उपाय म्हणून खबरदारी घेत सार्वजनिक बांधकाम विभागाने हा पूल वाहतुकुसाठी बंद केला. यामुळे स्थानिक नागरिकांसह लोटे एमआयडीसीकडे जाणार्या कामगारांचीही मोठी गैरसोय होत होती. शिवाय मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरची वाहतूक पेठमाप अंतर्गत मार्गावर वाढल्याने सातत्याने वाहतूक कोंडीलाही सामोरे जावे लागत होते.www.konkantoday.com