
ईगल इन्फ्रा प्रा. लि., चेकत इंटरप्रायझेस, रवी इन्फ्रा, जे. एस. म्हात्रे या कंपन्यांना सुमारे साडेनऊ कोटी एवढी रॉयल्टी (स्वामित्वधन) भरण्याबाबत जिल्हा प्रशासनाकडून नोटीस
मुंबई गोवा महामार्गाच्ईगल इन्फ्रा प्रा. लि., चेकत इंटरप्रायझेस, रवी इन्फ्रा, जे. एस. म्हात्रे या कंपन्यांचा यात समावेश आहे. त्यांच्याकडुन सुमारे साडेनऊ कोटी एवढी रॉयल्टी (स्वामित्वधन) भरण्याबाबत जिल्हा प्रशासनाने नोटीसया चौपदरीकरणाचे काम करणाऱ्या चार कंपन्यांना गौण खनिज (काळ दगड) उत्खननाची रॉयल्टी थकवल्याचा फटका बसला आहे. या कंपन्यांना जिल्हा प्रशासनाने 31 मार्चपर्यंत रॉयल्टी भरण्याबाबत नोटीसा बजावल्या आहेत. ईगल इन्फ्रा प्रा. लि., चेकत इंटरप्रायझेस, रवी इन्फ्रा, जे. एस. म्हात्रे या कंपन्यांचा यात समावेश आहे. त्यांच्याकडुन सुमारे साडेनऊ कोटी एवढी रॉयल्टी (स्वामित्वधन) भरण्याबाबत जिल्हा प्रशासनाने नोटीस बजावली आहे.मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाने वेग घेतला आहे.
गेली तेरा तो चौदा वर्षे झाली या महामार्गाचे काम सुरू आहे. याचे सहा टप्पे करून वेगवेगळ्या कंपन्यांना त्याचा ठेका दिला होता. त्यापैकी काही कंपन्यांनी काम सोडले, त्याच्याएवजी दुसऱ्या कंपन्यांना काम दिले आहे. डिसेंबर 2025 महामार्ग पुर्ण करण्याची डेडलाईन देण्यात आली आहे. केंद्र आणि राज्य शासन या कामावर नजड ठेऊन आहे. त्यामुळे काही प्रमाणात कामाला गती मिळाली आहे. अनेक ठिकाणी चौपदरीकरण झाले आहे. काही टप्प्यातच हे काम शिल्लक असताना ठेकेदार कंपन्यांना जिल्हा प्रशासनाने दुसरा दणका दिला आहे. कंपन्यांनी केलेल्या उत्खननापैकी अनेक कंपन्यांनी गौण खनिज उत्खननाची रॉयल्टीच भरली नसल्याचे पुढे आले आहे.