
अज्ञात कारणातून रत्नागिरी शहरातील शासकीय वसतिगृहातील कर्मचाऱ्याला मारहाण.
अज्ञात कारणातून रत्नागिरी शहरातील शासकीय वसतिगृहातील कर्मचाऱ्याला मारहाण केल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली. या मारहाणीत कर्मचारी जखमी झाला असून, मारहाणप्रकरणी तिघांविरोधात रत्नागिरी शहर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संकेत कांबळे, प्रताप सुदाम कांबळे आणि शुभम पाडाळकर अशी गुन्हा दाखल केलेल्या तिघांची नावे आहेत. तर, या मारहाणीत रितेश मधुकर सोनवणे (२९, मूळ रा. जळगाव, सध्या रा. कारवांचीवाडी, रत्नागिरी) हे जखमी झाले आहेत. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, रविवारी सायंकाळी ५:४५ वाजण्याच्या दरम्यान ते मुलांच्या शासकीय वसतिगृहाच्या रूम नंबर ४ मध्ये काम करत होते. त्या वेळी तिघांनी तिथे येऊन त्यांना मारहाण केली.