
सिंधुदुर्ग जिल्ह्यात चालत्या दुचाकीला गवारेड्यांची धडक , दुचाकीस्वार जागीच ठार.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रिवडे येथील जॅकी ऑगस्तीन अल्मेडा वय 60 रा कारिवडे पेडवेवाडी हे कुडाळ येथे दुचाकीवरून कामावर येत असताना त्यांना गवारेड्याच्या कळपाने उडवले. यामध्ये आल्मेडा यांचा जागीच मृत्यू झाला.ही घटना सावंतवाडी कुडाळ मार्गावर हुमरस उंचवळा येथे २६ रोजी पहाटे ५.३० वा च्या सुमारास घडली . यातील जॅकी ऑगस्तीन अल्मेडा हे कुडाळ मधील एका हॉटेलमध्ये कुक म्हणून काम करतात. नेहमीप्रमाणे ते पहाटे आपल्या कामावर येत होते. हुमरस येथे आल्यावर त्यांना प्रथम दोन गवारेडे रस्ता ओलांडताना आढळले. म्हणून त्यांनी आपल्या ताब्यातील दुचाकी थांबवली.
गवारेड्यांनी रस्ता ओलांडताच त्यांनी आपली दुचाकी चालू करून पुढे गेले. काही अंतरावर जाताच एक गवारेड्यांचा कळप समोर आडवा आला. यावेळी त्यांना गाडीवर नियंत्रण मिळवणे शक्य झाले नाही. त्यामुळे गवारेड्यांनी अल्मेडा यांना मोटरसायकलसह उडवून दिले. यानंतर तेथून जाणाऱ्या अन्य एका व्यक्तीनेही कुडाळ पोलीस स्टेशनला माहिती दिली. मात्र त्याला नेमके घटनास्थळ सांगता येत नव्हते.
११२ नंबर वरूनही कणकवली येथील एका व्यक्तीने कुडाळ पोलीस स्टेशनला या घटनेची माहिती दिली. मात्र यापुर्वीच यानंतर १०८ या रूग्णवाहिकेने त्यांना कुडाळ ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. कुडाळ पोलीस स्टेशनचे पोलीस जीवन कुडाळकर यांनी पंचनामा केला.