
राजूल पटेल यांचा जय महाराष्ट्र.
अंधेरी वर्सोवातील कट्टर शिवसैनिक आणि नेत्या राजूल पटेल यांनी उद्धव ठाकरे गटाला रामराम ठोकला. त्यांचे या परिसरात मोठे कार्य आहे. महिला संघटनात त्यांचा हातखंड आहे. त्यांनी सोमवारी मातोश्रीला रामराम केला. विधानसभा निवडणुकीपासूनच त्या उद्धव सेना सोडतील अशी चर्चा रंगली होती. ती आता खरी ठरली. मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेच्या आक्रमक नेत्या म्हणून त्यांची ओळख आहे. त्या तीन वेळा नगरसेविका म्हणून निवडून आल्या.
शिवसेनेच्या माजी नगर सेवक राजुल पटेल यांनी शिंदे गटाकडे जाताना शिवसेनेच्या शाखेला टाळे ठोकले होते. राजूल पटेल यांनी शिंदे गटात प्रवेश करण्याअगोदर शाखेला टाळ लावून चावी स्वत:कडे ठेवल्याने ठाकरे गटाचे पदाधिकारी शाखेबाहेर जमले होते. यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कुलूप तोडून शाखेत प्रवेश केला. या वेळी अनिल परब स्वत: शाखेत उपस्थित होते, असे समोर येत आहे.