
रत्नागिरी शहरातील जयस्तंभ येथे पादचारी तरुणाला दुचाकीची धडक.
रत्नागिरी शहरातील जयस्तंभ येथे पादचारी तरुणाला दुचाकीने धडक दिली. स्वाराने जखमी तरुणाला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असून रुग्णालयात पलायन केले. पोलिस संशयिताचा शोध घेत आहेत. ही घटना शनिवारी (ता. २५) रात्री साडेअकराच्या सुमारास जयस्तंभ येथे घडली.पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार अफाक नुरुद्दीन वस्ता (वय ३८, रा. राजिवडा-रत्नागिरी) असे जखमी पादचाऱ्याचे नाव आहे.
शनिवारी वस्ता हे कामानिमित्त आठवडा बाजार येथे आले होते. तेथून ते परत चालत जात असताना जयस्तंभ येथे समोरुन येणाऱ्या अज्ञात दुचाकीस्वाराने वस्ता यांना धडक दिली. त्यामध्ये ते जखमी झाले. स्वाराने त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले मात्र तेथून त्याने पलायन केले.