
पोलिस चौकीत सेवा बजावत असणाऱ्या पोलिस हवालदाराला घोणस जातीचा सापाचा दंश.
हातखंबा पोलिस चौकीत सेवा बजावत असणाऱ्या पोलिस हवालदाराला घोणस जातीचा साप चावला. उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. संजय मधुकर जाधव (वय ५० रा. फगरवठार, रत्नागिरी) ही घटना शनिवारी (ता. २५) रात्री सव्वानऊच्या सुमारास मदत केंद्र हातखंबा पोलिस चौकी येथे घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिस हवालदार जाधव हे रात्री मदत केंद्रात सेवा बजावत असताना सव्वा नऊच्या सुमारास दरवाजात उभे राहिले असता अचानक त्यांना घोणस जातीचा साप चावला. सहकारी पोलिस जमादार नाटेकर यांनी तात्काळ त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.