
गावडे आंबेरे बिर्जे वाडी येथे जुगादेवी मंदिरात दिनांक भजनाच्या डबलबारी चा कार्यक्रम
गावडे आंबेरे बिर्जे वाडी येथे जुगादेवी मंदिरात दिनांक ०६/१०/२०२४ रोजी भजनाच्या डबलबारी चा कार्यक्रम दणक्यात पार पडला. श्री आई जुगादेवी ,श्री आई जाकादेवी, श्री आई निनावी देवी ह्या आपल्या देवतांच्या कलशारोहणाच्या कार्यक्रमाची ज्यांनी आपल्या भजनाच्या सुमधूर वाणी ने सांगता केली ते म्हणजे _”बुवा. श्री अभिषेक शिरसाट”_ यांनी पुनः एकदा आपल्या सूमधुर वाणीने “बुवा.श्रीकांत शिरसाट” यांच्या साथीने जुगादेवी मातेच्या नवरात्र उत्सवाला खऱ्या अर्थाने रंग चढवला… जुगादेवी मातेच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ह्या बिर्जे वाडी भूमित येऊन “कानपाट फोडीन ,ह्या फोडीन ता फोडीन असली भजनं करणारे आम्ही नाही.” ‘कारण ह्या बिर्जे वाडी चा इतिहास ,ही भूमी अतिशय पवित्र आहे..’ हे अभिषेक शिरसाट बुवा यांनी आपल्या भजनाच्या प्रारंभी सांगितले आणि आपल्या सुमधुर वाणीने सगळ्यांना भक्ती रसाने मंत्रमुग्ध केले. त्याच सोबतच बुवा.श्रीकांत शिरसाट यांनी ह्या बिर्जे वाडीचा आणि आई जुगादेवी चा इतिहास जाणून घेत म्हणाले “ही बिर्जे वाडी ची एकजूट आहे ; ती अशीच कायम राहो हीच आई जुगादेवी मातेच्या चरणी प्रार्थना करून”, भजनाला सुरुवात करत म्हणाले “बोतड नाही झाली धार शिवरायांच्या तलवारीची अजून कुणाची हीमंत नाही आहे बिर्जेवाडी कडे वाकड्या नजरेनं पाहण्याची” दोन्ही बुवांनी आपल्या गमतीदार भाषाशैली च्या माध्यमातून हरी नामाचा, स्त्री – शक्तीचा जागर करत सर्व रसिकांना ,भजनी प्रेमींना आनंद देत भजन रूपाने देवीची सेवा केली. या प्रसंगी बिर्जेवाडी तील सर्व ग्रामस्थ व अनेक ठिकाणं हुन श्रोते उपस्थित होते.